नवी दिल्ली –
जग्वार लँड रोवर (जेएलआर)ने आपल्या नव्या एफ-पीएसीई (पेस)एसव्हीआर सुव्ह गाडीच्या बुकिंगला सुरूवात केली आहे. बाह्य उत्तम डिझाइनसह अनेक वैशिष्टय़े या नव्या गाडीत सामावलेली आहेत. अंतर्गत सजावटही लक्झरी स्वरूपाची असून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधाही या गाडीत आहेत. सदरच्या गाडीची किंमत 46.64 लाखापासून सुरू होते. एक्सईची किंमत 46.64 लाख रुपये, एक्सएफची किंमत 55.67 लाख रुपये, आय पेसची किंमत 1.05 कोटी रुपये आणि एफ टाइपची किंमत 97.97 लाखापासून सुरू होते.