प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील जेष्ठ उद्योजक विश्वासराव जयबारावा राणे उर्फ अण्णा यांचे रविवारी मध्यरात्री दिर्घकाळ आजाराने राहत्या खडकी सत्तरी या त्याच्या घरी निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसापासून एका विशिष्ट रोगाने त्रस्त झाले होते. वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. अवघ्याच दिवसापूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे खडकी येथे त्यांच्या निवासस्थानी हलविण्यात आले होते. तीन दिवसापासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वासराव राणे हे सत्तरी तालुक्मयातील उद्योजक व राजकारणी म्हणून ओळखले जात होते. खोतोडा पंचायतीचे पंच सभासद सरपंच काँग्रेस पक्षाचे ज्ये÷ कार्यकर्ते त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपली विशिष्ट प्रतिमा निर्माण केली होती. सत्तरी तालुक्मयाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. वेगवेगळय़ा उपक्रमात त्यांचे चांगल्या प्रकारचे आर्थिक पाठबळ प्राप्त होते.
खडकी येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे ते चेअरमन होते .त्याचप्रमाणे सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव सोसायटीचे संचालक व वेगवेगळय़ा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. संदर्भाची ही वार्ता कळताच आज सकाळी विविध क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी उपस्थिती लावून त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी यावेळी खास उपस्थिती लावून त्यांना पुष्पाजली वाहिली. यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रतापसिंह राणे यांनी सांगितले की विश्वासराव राणे यांनी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे योगदान दिले. समाजाच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे हे आपण विसरून चालणार नाही. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारची भूमिका समाजामध्ये भावली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी यावेळी बोलताना विश्वासराव राणे यांच्या निधनामुळे सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळे क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण होणार आहे. त्यांनी समाजाच्साठी चांगल्या प्रकारचे योगदान दिले आहे त्यांचे योगदान हे कधीही विसरले जाणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली . त्यांच्या पश्चात पुत्र नामदेव स्न?षा विवाहित कन्या असा परिवार आहे.