वृत्तसंस्था/माद्रिद
अलीकडेच झालेल्या पेंच ओपन ग्रँडस्लॅमचे जेतेपद मिळविलेल्या सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विम्बल्डनची तयारी करण्यासाठी मॅलोर्का चॅम्पियनशिपमध्ये दुहेरीत खेळून सराव करणार असल्याचे स्पर्धा आयोजकानी सांगितले.
जोकोविचने नदाल व सित्सिपस यांचा उपांत्य व अंतिम फेरीत पराभव करून कारकिर्दीतील 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. त्याने जर विम्बल्डन स्पर्धा सहाव्यांदा जिंकली तर नदाल व फेडरर यांच्याशी त्याची बरोबरी होईल. या दोघांनीही आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. मॅलोर्का चॅम्पियनशिपही ग्रास कोर्टवर होत असून 19 जूनपासून त्याची सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेत जोकोविच एकेरीत खेळणार नसल्याचे सांगण्यात आले.