आंध्रप्रदेशच्या पद्मावतीने दिवंगत पतीच्या स्मरणार्थ उभारले मंदिर
स्वप्नातील इच्छेनंतर मार्बलची मूर्ती तयार करत प्रतिदिन पूजा
आंध्रप्रदेशमध्ये प्रकाशम अंकिरेड्डी आणि त्यांची पत्नी पद्मावती यांचा विवाह काही वर्षांपूर्वीच झाला होता. एका दुर्घटनेत प्रकाशम यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पद्मावती यांच्यासाठी जगणे अवघड ठरले होते. सुमारे 4 वर्षांपर्यंत त्या स्वतःच्या पतीच्या आठवणींमध्ये दिवसरात्र रडत होत्या.
प्रकाशम या जगातून निघून गेल्यावर ते काही दिवसांनी माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी स्वतःच्या नावाने मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती असे पद्मावती यांनी सांगितले आहे. पद्मावती यांनी दिवंगत पतीची इच्छा पूर्ण करत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंदिर उभारले आहे. या मंदिरात पतीची मार्बलची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पद्मावती या मंदिरात दररोज पतीची पूजा करत आहेत. पती जिवंत असतानाही मी त्यांच्या देवाच्या स्वरुपात पहायचे असे पद्मावती म्हणाल्या.
पद्मावती या दर पौर्णिमेला स्वतःच्या पतीच्या स्मरणार्थ उभारलेल्या मंदिरात गरीबांना अन्नदान करतात. हे काम त्यांचा मुलगा शिवशंकर रेड्डी हा प्रकाशम यांच्या एका मित्राच्या मदतीने करतो. या मूल्यांचा आदर करणाऱया आईवडिलांनी मला जन्म दिला हे माझे सौभाग्य आहे. मी माझ्या पालकांना एक आदर्श जोडपे मानत असल्याचे शिवशंकरने म्हटले आहे.