प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग येथील प्रसिद्ध कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या दहाव्या बंपर सोडतीचे मानकरी कालकुंद्री येथील जोतिबा पाटील ठरले. त्यांना गुजरात, केरळ टूरचे पॅकेज बक्षीस रूपाने देण्यात आले.
या सोडत कार्यक्रमप्रसंगी हलकर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष परशराम पाटील, लोकोळी ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील, बिल्डिंग कॉन्ट्रक्टर जोतिबा शहापूरकर, नारायण कदम, कंग्राळीचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, हणमंत वालेकर आदी उपस्थित होते.
कलाश्री बंबचे संचालक प्रकाश डोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कलाश्रीच्या योजनांची माहिती दिली. गुजरात-केरळ टूर पॅकेज या बंपर बक्षिसासोबत इतरही सहा लकी ड्रॉच्या माध्यमातून सहा जणांना पाच लीटरचे कुकर गिफ्ट देण्यात आले. त्यामध्ये अंकुश धामणेकर (कुदेमनी), कल्लाप्पा सावंत (हंगरगा), सुनील पाटील (कंग्राळी खुर्द), गीता केलीपत्ती (वडगाव), अमोल हेब्बाळकर (हत्तरगुंजी), संजोग मेलगे (मास्कोनहट्टी) यांचा यामध्ये समावेश आहे.
कलाश्रीच्यावतीने होलसेल जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून घरगुती वापराच्या व जीवनावश्यक वस्तूही नागरिकांच्या सोयीसाठी अगदी माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कलाश्रीचे संचालक प्रकाश डोळेकर यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन श्रीधर पाटील यांनी केले तर संजय भोसले यांनी आभार मानले. यावेळी कै. उमेश शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.