प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी भाजपात रितसर प्रवेश केला. त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याची माहिती भाजपच्या तिकीटावर दावा करणारे गुरुदास शिरोडकर यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले जोसेफ सिक्वेरा आमच्यासाठी नवीन नाही. त्यांनी 2012 च्या निवडणुकीत भाजप पक्ष सत्तेवर येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला होता. व त्यांच्या पाठिंब्यानेच भाजपला विजय प्राप्त झाला होता. आता ते भाजपात रितसर प्रवेश करून आले आहेत. आपण कळंगुटमध्ये भाजपची मुहूर्तमेढ उभी केली पण काही दिवसांपूर्वी माजी आमदाराला कंटाळून भाजपला राम राम ठोकला. मात्र लोबोनी पक्ष सोडल्यानंतर आपण पक्षात रितसर पुन्हा प्रवेश केला. आपण पक्षाचा लोयल प्रामाणिक सोलजर आहे. आपण कळंगुटमध्ये विविध समित्या उभ्या केल्या. आता जोसेफ सिक्वेरा पक्षात येऊन भाजप कळंगुटमध्ये बळकट झाला असून आपण त्यांचे या पक्षात स्वागत करतो असे गुरुदास शिरोडकर यांनी सांगितले.