ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या ‘सी स्प्रिंग’ बंगल्यातील सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे हा बंगला बीएमसीने सील केला आहे.
वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. या बंगल्यात दोन सिक्युरिटी गार्ड असतात. यातील एका गार्डचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बीएमसीने हा बंगला कन्टेन्मेन्ट झोन म्हणून घोषित केला आहे.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी रेखा यांच्या बंगल्याबाहेर कन्टेन्मेन्ट झोन म्हणून नोटीस लावली आहे. तसेच हा बंगला संपूर्ण सॅनिटाईज करण्यात आला आहे. रेखा यांच्या शेजारील गीतकार जावेद अख्तर यांच्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांचीही चाचणी करण्यात आली आहे.