बेंगळूर
संस्थापक नितीन कामत यांची कंपनी झिरोदा लवकरच आपला म्युच्युअल फंडाचा व्यवसाय सुरू करणार आहे. अशी माहिती नुकतीची कंपनीने ट्वीट करून दिली आहे.भारतातील मोठी ब्रोकिंग फर्म झिरोदा आता म्युच्युअल फंड व्यवसायात उडी घेणार आहे. त्याकरीता त्यांनी बाजारातील नियामक सेबीकडे अर्थात सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रीतसर परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. अखेर सेबीने परवानगी दिली असल्याने झिरोदाचे म्युच्युअल फंड व्यवसायात पदार्पण निश्चित झाले आहे.