वृत्तसंस्था/ स्ट्रासबर्ग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या स्ट्रासबर्ग महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या सातव्या मानांकित बार्बरा क्रेजिकोव्हाने एकेरीचे जेतेपद पटकाविताना सोरेना सिरेस्टीचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रेजिकोव्हाने सिरेस्टीचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील क्रिजिकोव्हाचे हे पहिले विजेतेपद आहे. पॅरीसमध्ये रविवारपासून सुरू झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत क्रिजिकोव्हाचा पहिल्या फेरीतील सामना झेकच्या प्लिसकोव्हाबरोबर होणार आहे. तसेच सिरेस्टीची सलामीची लढत ब्रिटनच्या कोंटाशी होणार आहे.