सदरचा व्यवहार 1.4 ते 1.8 लाख कोटीपर्यंत होण्याचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मीठापासून सुरु झालेल्या व्यवसायाचा विस्तार सॉफ्टवेअरपर्यंत करणारा टाटा समूह आपला सुपर ऍप आणण्याच्या तयारीत आहे. सदर ऍपच्या आधारे टाटा समूह रिटेल क्षेत्रात मजबूत स्थान निर्माण करण्याच्या तयारीत आहे. याच ऍपच्या आधारे निधी उभारण्याचे संकेत असून यासंदर्भात चर्चाही सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. सदरच्या कार्यासाठी निधी जमा करण्यासाठी सुपर ऍपमधील हिस्सेदारी टाटा विकण्याचे संकेत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुपर ऍपमधील हिस्सेदारी अमेरिकेतील होलसेल कंपनी वॉलमार्ट इंक घेऊ शकते. यासंदर्भात टाटा समूहाची वॉलमार्टसोबत चर्चा सुरु आहे. यामध्ये वॉलमार्ट इंक सुपर ऍपमध्ये वॉलमार्ट इंक सुपर ऍपमध्ये 1.4 ते 1.8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्मयता आहे. सदरचा व्यवहार सकारात्मक झाल्यास देशातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठा संयुक्त स्वरुपात मोठा व्यवहार ठरणार असल्याचेही म्हटले आहे. वॉलमार्टने मे 2018 मध्ये ई कॉमर्सची 66 टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. टाटा अन्य गुंतवणूकदारांसोबतही चर्चा करते आहे.
अन्य गुंतवणूकदारांसोबत चर्चा
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार सुपर ऍपची हिस्सेदारी विकल्यानंतर टाटा समूह अन्य गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरु ठेवणार आहे. यामध्ये काही ग्लोबल कंपन्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
डिसेंबरपर्यंत येणार ऍप
टाटा समूहाचे हे ऍप डिसेंबरपर्यंत सादर करण्यात येणार आहे. देशातील मोठय़ा ई कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायाकडे पाहूनच कंपनीने हा निर्णय घेतलेला आहे. सदर ऍपवर खाण्यापिण्यासह, फॅशन, लाईफस्टाईल आणि बिल पेमेंटचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.