पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकाऱयाने आयोजित आयोजित तिसऱया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसो याने भारताच्या रामकुमार रामनाथनाथनचा तर झेकियाच्या जिरी वेस्ली याने अर्जुन कढेचा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 2 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 182 असलेल्या भारताच्या 25 वषीय रामकुमार रामनाथनचा जागतिक क्रमांक 98 असलेल्या 27 वषीय इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसो याने 3-6,6-4,7-5 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला. रामनाथनने पहिला सेट 3-6 असा जिंकल्यानंतर साल्वाटोर कारुसो याने पुर्ण क्षमतेनिशी खेळत दुसरा व तीसरा सेट अनुक्रमे 6-4,7-5 असे जिंकत सामन्यात विजय मिळवला.
1 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत जेम्स डकवर्थ याने जर्मनीच्या पीटर गोजोझिक याचा 7-6(5), 6-4 असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमांक 96 असलेल्या 28 वषीय जेम्सने पहिल्या सेटमध्ये सावकाश सुरूवात केली. बाराव्या गेमपर्यंत सामना 6-6 असा बरोबरीत राहिल्याने सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्येही जागतिक क्रमांक 106 असलेल्या 30 वषीय पीटरने चांगली झुंज दिली. मात्र जेम्सने 7-6(5) असा सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱया सेटमध्ये चौथ्या गेमपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत असताना पाचव्या गेममध्ये जेम्सने पीटरची सर्व्हिस ब्रेक करत सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. सहाव्या आठव्या व दहाव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत 6-4 असा सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला.
पुण्याचा वाईल्ड कार्ड प्राप्त 26 वर्षाय जागतिक क्रमांक 612 असलेला अर्जुन कढेचा झेकियाच्या 26 वषीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या जिरी वेस्ली याने 6-2,6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये जिरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत अर्जुनवर दबाव निर्माण केला. चौथ्या गेमपर्यंत जिरीने 3-1 अशी आघाडी घेत पाचव्या गेममध्ये पुन्हा अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली. सहाव्या व आठव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत जिरीने पहिला सेट 6-2 असा खिशात घतला. दुसऱया सेटमध्येही पहिल्याच गेममध्ये जिरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढे दहाव्या गेमपर्यंत जिरीने स्वतःची सर्व्हिस राखत दुसरा सेट 6-4 असा जिंकत. सामना 6-2,6-4 असा जिंकून दुसऱया फेरीत प्रवेश केला.
आठव्या मानांकीत बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याने इटलीच्या पाओलो लोरेन्झी याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर इटलीच्या रॉबर्टो मार्कोराने झेकियाच्या लुकास रोझोल याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- पहिली फेरी
साल्वाटोर कारुसो (इटली)(7)वि.वि रामकुमार रामनाथन(भारत) 3-6,6-4,7-5
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि अर्जुन कढे (भारत) 6-2, 6-4
जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया)(6)वि.वि पीटर गोजोझिक (जर्मनी) 7-6(5), 6-4
एगोर गेरासीमोव्ह (बेलारूस)(8) वि.वि पाओलो लोरेन्झी (इटली) 6-2, 6-3
रॉबर्टो मार्कोरा (इटली) वि.वि लुकास रोझोल (झेकिया) 6-3, 6-2