वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनला एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व स्पर्धा लांबणीवर किंवा स्थगित कराव्या लागल्या त्यामुळे एटीपीच्या स्पर्धा कार्यक्रमांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. आता 2021 साली होणाऱया एटीपी टूरवरील टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या तारखेत बदल होण्याची सूचना स्पर्धा संचालकांनी दिली आहे.
एटीपी टूरवरील दक्षिण आशियामध्ये एकमेव पुरूषांची टेनिस स्पर्धा भारतात घेतली जाते. टाटा खुली महाराष्ट्र ही एटीपी टूरवरील स्पर्धा पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आली होती. 2021 च्या टेनिस स्पर्धा वेळापत्रक निश्चित करताना बऱयाच समस्येवर चर्चा करावी लागेल. 2021 साली होणाऱया चौथ्या टाटा खुल्या महाराष्ट्र पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचे ठिकाण कदाचीत बदलावे लागेल तसेच या स्पर्धेच्या तारखेतही बदल करावा लागेल, अशी सूचना स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी दिली आहे.