30 जूनपर्यंत ग्राहकांना मिळणार दिलासा – वॉरंटी-फ्री सर्व्हिसच्या कालावधीत वाढ शक्य
नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे अनेक कंपन्या सेवा सुविधांमध्ये बदल करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये आता टाटा मोर्ट्स आपल्याकडून देण्यात येणाऱया वॉरंटी आणि फ्री सर्व्हिससंबंधीचा कालावधी वाढविणार असल्याची माहिती आहे. सदरचा कालावधी हा येत्या 30 पर्यंत वाढविला जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. याचा अर्थ ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल आणि 30 मे रोजी समाप्त होत आहे, त्यांना येत्या 30 जूनपर्यंत दिलासा मिळणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
लॉकडाऊन प्रभावामुळे प्रतिबंध
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे आणि पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे हा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे म्हटले आहे. विविध ग्राहकांच्या मेटेनन्सच्या सेवा घेऊ शकणार नाही. त्यामध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने लागू केलेल्या नियमावलीच्या प्रभावांचाही यावर परिणाम होणार असल्याची माहिती आहे.
ग्राहकांना दिलासा
आपल्या वेगवेगळय़ा सुविधा बंदच्या काळात मिळणार की नाही, याची काळजी करण्याची चिंता कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना करावी लागणार नसल्याचे यामधून स्पष्ट झाले असल्याचे कंपनीच्या कस्टमर विभागाच्या प्रमुख डिंपल मेहता यांनी म्हटले आहे.