नवी दिल्ली
टाटा स्टील कंपनीला चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जवळपास 4,010.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. उत्पन्न वाढल्याने कंपनीला नफा कमाई झाल्याची नोंद केली आहे. टाटा स्टीलने बीएसईला यासंबंधीची माहिती दिली आहे. या अगोदच्या आर्थिक वर्षात 2019-20 च्या तिमाहीत कंपनीला 1,228.53 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. चालू आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 39,809.05 कोटींवर राहिले असल्याचे कंपनीने बीएसईला दिलेल्या माहितीमधून स्पष्ट केले आहे. एक वर्षाच्या अगोदर तिमाहीत उत्पन्न 35,613.34 कोटी रुपये होते. कंपनीचा खर्च हा तिमाहीत 34,183.18 कोटी रुपये राहिला आहे.