कोलकाता
टाटा स्टीलच्या पोलाद उत्पादनात वाढ झाली असून विक्रीत मात्र घट झाल्याची बाब समोर आलीय. पोलाद उत्पादन क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा स्टीलचे एकत्रित उत्पादन तिसऱया तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबर 2021 कालावधीत 2 टक्के वाढून 7.68 दशलक्ष टनवर पोहचले आहे. मागच्या वर्षी याच अवधीत हे उत्पादन 7.51 दशलक्ष टन इतके होते. डिसेंबर 2021 मध्ये टाटा स्टीलने 4.80 दशलक्ष इतके स्टील उत्पादीत केले होते. तर डिसेंबरमध्ये विक्री घटून 4.41 दशलक्ष टनवर राहिली आहे.