नवी दिल्ली
पोलाद उत्पादन क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी टाटा स्टीलने जून तिमाही अखेर आपल्या कच्च्या पोलादाच्या उत्पादनात 43 टक्के वाढ दर्शवली असून दुसरीकडे 35 टक्के इतकी पोलादाच्या विक्रीत वाढ नोंदवली आहे. जून 30 अखेर टाटा स्टीलने 7.94 दशलक्ष टन इतक्मया पोलादाची निर्मिती केली आहे. मागच्या वषी हेच समान कालावधीतील उत्पादन 5.53 दशलक्ष टन इतके होते. कंपनीच्या कच्च्या पोलादाच्या विक्रीत 35 टक्के इतकी वाढ दिसली आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीने 7.14 दशलक्ष टन इतक्मया पोलादाची विक्री केली आहे. याच तुलनेत मागच्या वषी 5.33 दशलक्ष टन इतक्मया पोलादाची विक्री करण्यात आली होती.