मुंबई
घडय़ाळाच्या क्षेत्रामध्ये लोकप्रियता प्राप्त केलेल्या टायटन कंपनीने माँटब्लँक यांच्यासोबतची आपली 5 वर्षाची जुनी मैत्री नुकतीच मोडीत काढली आहे. टाटाची रिटेल फर्म असणाऱया टायटनने लक्झरी पेन व घडय़ाळ निर्माती कंपनी माँटब्लँक यांच्यासोबतची संयुक्त भागीदारी संपुष्टात आणली आहे. यासंबंधीचा निर्णय टायटनने नुकताच घेतला आहे. दागिने, घडय़ाळ व डोळय़ांचे चष्मे विक्री करणाऱया टायटनला आता आपल्या स्वतःच्या उत्पादन विक्रीवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आजवरच्या भागीदारीतून दोन्ही कंपन्यांना उत्तम फायदा झाला आहे.