वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टोओपीएस) मध्ये स्थान मिळविण्यासाठी अर्जुन पुरस्कार तसेच आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक पुरेसे नाही हे दिसून आले आहे. शासनाच्या टीओपीएस कोअर गटामध्ये निवडण्यात आलेल्या विविध खेळाडूंच्या यादीत आशियाई स्पर्धेतील पुरूषांच्या तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळविणाऱया अरपिंदर सिंगला वगळण्यात आले आहे.
2019 चा ऍथलेटिक हंगाम अरपिंदर सिंगला म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही. त्याच्या कामगिरीची दखल घेतल्यानंतरच टीओपीएसच्या कोअर गटासाठी त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या कोअर गटामध्ये भारताचा धावपटू केटी इरफान आणि भालाफेक ऍथलीट शिवपाल सिंगचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिला धावपटू दुती चंदला या कोअर गटामध्ये स्थान दिल्याची माहिती क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात आली.
या कोअर गटामध्ये भारताची महिला भालाफेकपटू अनुराणी, अरोकिया राजीव, नोहा निर्मल टॉम, ऍलेक्स अँथोनी, एम.आर. पुवम्मा, गोळाफेकपटू तेजिंदर पाल सिंग तूर यांचा समावेश आहे. चोप्रा, हिमा आणि शिवपाल हे टोकियो ऑलिंपिकसाठी यापूर्वीच पात्र ठरले आहेत.