68 सावकारांकडून 4 कोटी 58 लाखांचे कर्ज : जिह्यात 13 सावकारांची वाढ
केतन पिलणकर / रत्नागिरी
टाळेबंदी काळात जिह्यातील 68 खासगी सावकारांकडून तब्बल 4 कोटी 58 लाखांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आह़े यात सर्वाधिक खासगी सावकार रत्नागिरी तालुक्यातील असून येथील 50 खासगी सावकारांनी 4 कोटी रुपयांची कर्ज दिले, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाली आह़े
चिपळूण तालुक्यातील 15 सावकारांनी 40 लाख 96 हजार तर खेडमधील 2 सावकारांनी 4 लाख 61 हजार, संगमेश्वर तालुक्यातील केवळ एका सावकाराने 9 लाख 97 हजार इतके कर्ज दिले आह़े गतवर्षी जिह्यातून 55 सावकारांकडून 1 कोटी 12 लाख रुपयांचे कर्ज दिले होत़े मात्र यावर्षी टाळेबंदी काळातच तब्बल 4 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले आहे. टाळेबंदीमुळे रोजगार, नोकरी-उद्योग गेल्यामुळे सर्वसामान्यांची पावले खासगी सावकारांकडे वळल्याचे दिसून येत़े मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा व राजापूर येथे खासगी सावकार असल्याची नोंद नाह़ी गतवर्षीपेक्षा यंदा 13 खासगी सावकारांनी शासनाकडून अधिकृत परवाना मिळवला आह़े त्यामुळे जिल्हय़ातील खासगी सावकारी करणाऱयांची एकूण संख्या 68 झाली आह़े
टाळेबंदीत सर्व प्रकारचे व्यवसाय उद्योग, खासगी नोकरी ठप्प पडले होत़े यामुळे उत्पन्न थंडावले मात्र खर्च होतच राहिला. टाळेबंदी जसजशी शिथील होताच वीज बीले, कर्जाचे हप्ते यांचा तगादा सुरु झाला. यामुळे सर्वसामान्यांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय नव्हत़ा पतसंस्था अथवा बँका सर्वसामान्यांना कर्ज देण्यासाठी हात आखडते घेऊ लागल्याने सर्वसामान्यांवर खासगी सावकारांचे दार ठोठावण्याची वेळ आल्याचे म्हटले जात आहे.
खासगी सावकारांकडून झालेले कर्ज वाटप:
तालुका सावकार संख्या कर्जाची रक्कम कोटी
2019 2020 वर्ष 2019 2020
रत्नागिरी 43 50 92.61 04.03
चिपळूण 9 15 12.21 40.96
खेड 2 2 – 04.61
संगमेश्वर 1 1 07.85 09.97