प्रतिनिधी/ बेळगाव
कडोली येथील बसवाण्णा नगरातील श्री बसवाण्णा मंदिरापासून गंथदिंडीला सुरुवात झाली. कलमेश्वर भजनी मंडळाचे सदस्य हभप आप्पय्या पावणोजी यांच्या हस्ते पालखी आणि ग्रंथ पूजन करण्यात आले. कलमेश्वर भजनी मंडळ व कलमेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या गजराने गंथदिंडी निघाली. या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग, उद्घाटक अशोक नाईक, गणपत पाटील, महेश होनगेकर, डॉ. लक्ष्मण भैरु पाटील, लक्ष्मण सामजी पाटील, रुक्मिणी निलजकर, पी. आर. पाटील, ऍड. शाम पाटील, उमेश देसाई, भरतकुमार भोसले, बाबुराव गौंडाडकर, विनोद होनगेकर, ता. पं. सदस्य उदय सिद्दण्णावर, डॉ. विनोद पाटील, अरुण पाटील, भरमाण्णा डोंगरे, राजू पाटील, दीपक होनगेकर, मोहन पाटील, संजय जाधव, रणजित गिंडे यांच्यासह बहुसंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते. महिला मंडळाच्या सुहासिनींनी आरती ओवाळून संमेलन नगरीत साहित्यिकांचे स्वागत केले. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या ग्रंथदिंडीची सांगता झाली.