टाेप/प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील टाेप महाडिक काॅलनी परीसरातील एकाला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये एकच खळबळ माजली आहे.टाेप परिसरामध्ये कोरोनाने आज अखेर शिरकाव केला नव्हता परंतु आज आलेल्या या अहवालांने परिसरातील गांभिर्य वाढवले आहे.
महाडीक काॅलनी भाग सील केला असून. टाेप गाव सात दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय टाेप प्रशासनाने घेतला आहे. हा रुग्ण ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. ताे उद्यमनगर, गांधिनगर, शिराेली एम आय डी सी आदी भागात फिरला आहे प्रारंभी पेठवडगांव येथिल खाजगी रुग्णालय उपचार घेत हाेता. नंतर काेल्हापुरात खाजगी हाॅस्पिटलला ताे अॅडमीट आहे. त्याच्या संपर्कात कोण आले आहे याची माहिती आराेग्य विभागा मार्फत घेतली जात आहे.
टाेप ग्रामपंचायतीने तात्काळ हा परिसर सील केला आहे.तर खबरदारीची उपाययोजना म्हणुन औषधफवारणी करत आहेत.ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कोराेना दक्षता समिती सदस्य, आराेग्य विभाग, तंटामुक्त समिती, शिरोली पोलिस ठाण्याचे पाेलिस आधिकारी पाेलिस पाटील, ग्रामविकासआधिकारी यांनी खबरदारीच्या सर्व उपायोजना केलेल्या आहेत.