प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट ते दुसरे रेल्वेगेट येथे फूटपाथवर वाहने लावली जात आहेत. काही गॅरेज चालक फूटपाथवर दुरुस्तीसाठी आलेली वाहने पार्किंग करीत आहेत. त्यामुळे फूटपाथ पादचाऱयांसाठी की पार्किंगसाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे फूटपाथ मोकळे करून पादचाऱयांना खुले करून देण्याची मागणी रहिवासी व मॉर्निंग वॉकर्सकडून केली जात आहे.
तिसरे रेल्वेगेट ते दुसरे रेल्वेगेट परिसरात अनेक गॅरेज मालक आहेत. ते दुरुस्तीसाठी आलेली वाहने फूटपाथवर लावत आहेत. वाहनांची दुरुस्तीही या ठिकाणीच करीत आहेत. यामुळे पादचाऱयांना रस्त्यावरून चालत जाण्याची वेळ आली आहे. पादचाऱयांना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे फूटपाथवर वाहने लावणाऱयांवर कारवाई करून फूटपाथ मोकळे करण्याची मागणी होत आहे. सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकर्सना याचा त्रास होत आहे.