प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी रॉय रोड मागील भंगीबोळ पेव्हर्स ब्लॉक घालून निर्माण केला आहे. मात्र या ठिकाणी साचणाऱया कचऱयाची उचल आणि वाढलेली झाडे-झुडूपे हटविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा परिसर गलिच्छ झाला असून परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
शहर आणि उपनगरातील कचऱयाची उचल केली जाते. मात्र रस्त्यावर कचरा टाकण्याऐवजी भंगीबोळात टाकला जातो. पण भंगीबोळातील स्वच्छता वेळोवेळी केली जात नाही. तसेच टिळकवाडी परिसरातील प्रत्येक भंगीबोळात झाडे-झुडूपे वाढली आहेत. टिळकवाडी, अनगोळ अशा विविध भागातील भंगीबोळातील अतिक्रमणे हटवून स्वच्छ करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पेव्हर्स घालून स्वच्छ रस्ते बनविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र अलिकडे भंगीबोळांची दुरवस्था झाली असून मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. डेनेजवाहिन्या घालण्यासाठी काही ठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. तर काही ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.
त्यामुळे भंगीबोळात कचरा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच झाडे-झुडूपे वाढली असून महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही. परिणामी डांसांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. विशेषतः रॉय रोड मागील भंगीबोळात कचऱयाचे साम्राज्य वाढले असल्याने नागरिकांना असहाय्य बनले आहे. परिसर गलिच्छ झाल्याने येथील भंगीबोळांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.