प्रतिनिधी / बेळगाव
शहरात जुनाट वृक्ष कोसळून पडत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातच टिळकवाडी येथील पोस्ट ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये एक जुनाट वृक्ष मंगळवारी रात्री कोसळून पडले. सुदैवाने या ठिकाणी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शहरात सध्या वळीव पावसाला सुरुवात झाली असून जोरदार वाऱयाच्या प्रवाहाने अनेक वृक्ष कोसळून पडत आहेत. यात जुनाट वृक्षांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळय़ात जोराचा वादळी आल्यावर हे वृक्ष केव्हा कोसळून पडतील याचा नेम नाही. त्यामुळे प्रशासनाने अशा जुनाट वृक्षांचा धोका लक्षात घेऊन वेळीच हे जुनाट वृक्ष हटवावेत, अशी मागणी होत आहे.