वृत्तसंस्था/ मुंबई
ऍपल या कालावधीत टेक कंपन्यांना मागे टाकत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु यांचा एक सेगमेंट एअरपॉड्सने कमाईमध्ये जगातील सर्वात मोठय़ा कंपन्यांना मागे टाकल्याचे पहावयास मिळाले आहे. आकडय़ाच्या बाबतीत जगातील प्रमुख कंपन्यांच्या कमाईत फक्त एअरपॉड्सपेक्षा दोन कंपन्या पुढे असल्याची माहिती आहे.
एलॉन मस्कच्या टेस्लाची कमाई ही वर्ष 2020 मध्ये 31.5 अब्ज डॉलरवर राहिली आहे. तर नेट फ्लिक्सची 25 अब्ज डॉलरवर राहिली आहे. तिसऱया स्थानी ऍपलच्या एअरपॉड्सची कमाई असून हा आकडा 23.05 अब्ज डॉलरच्या घरात राहिला आहे. एअरपॉड्सची जोरदार विक्री होत आहे. ऍपलचे सर्वाधिक उत्तम एअरपॉड्स असल्याने त्यांचा खप वाढला आहे. ऍपलच्या फोनप्रमाणे याच्याही किमती महागल्या आहेत.
फोन आणि वाहनांच्या ऍक्सेसरीजवर खर्च
साधारणपणे फोन व गाडय़ाच्या ऍक्सेसरीजवर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जात असून फोनशी संबंधीत असणाऱया ऍक्सेसरीजमध्ये एअरपॉड्स, त्याचे स्टॅण्ड, केबल, पॉवरबँक, कव्हर आदी असते. तसेच वाहनांशी संबंधीत ऍक्सेसरिजमध्ये सीट कव्हरसोबत अन्य वस्तूंचा यामध्ये समावेश होतो. यामुळे कंपन्या इन ऍक्सेसरीजच्या किमती अधिकच्या ठेवल्या जात आहेत.
एअरपॉड्सच्या किमती 22 हजार रुपयावर ऍपलच्या एअरपॉड्सच्या किमती 22 हजार रुपयापर्यंत भारतामध्ये आहेत. वाढत्या मागणीमुळे यांच्या किंमती वाढल्या आहेत. ऍपल स्वस्त वस्तू बनवत नाही. यासोबत ऍपल एअरपॉड्स तीन लाँच करण्याच्या तयारीत आहे.