पुण्यामध्ये आय प्रोफेशनल हाऊसकिपर्स असोसिएशनच्या वतीने लेमट ट्री हॉटेल, पुणे स्टेशन येथे नुकतेच भारतातील सर्वात मोठे टॉवेल आर्ट साकारण्यात आले होते. याची नेंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
या आर्टमधून 50 फुटाची मगर साकारण्यात आली आहे. जवळपास लहान मोठय़ा 800 टॉवेलपासून या मगरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यामुळे या बलाढय़ टॉवेल आर्टची नोंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. निमित्त होते हॉटेल व्यवसाय सेमिनारचे. यामध्ये देशभरातून अनेक व्यवसायिक येथे सहभागी झाले होते. हाऊसकिपिंगमध्ये काही कला आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. देशात प्रथमच हाऊसकिपिंग असोसिएशनच्या वतीने हे टॉवेल आर्ट सादर करण्यात आले होते.
याबद्दल अधिक माहिती देताना लेमट ट्री हॉटेल विमान नगरचे कुणाल माने (आयोजन) यांनी सांगितले की हे टॉवेल आर्ट हाऊसकिपरची कला आहे. ती आम्ही सगळय़ांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि लोकांना दाखऊ इच्छितो की आम्ही अजून काय काय करू शकतो. आय प्रोफेशनल हाऊसकिपर्स असोसिएशनला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आम्ही हे टॉवेल आर्ट बनविले आहे. देशात प्रथमच अशा प्रकारे हाऊसकिपिंगने ही बलाढय़ कलाकृती बनविली आहे.