मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टोयोटाने अलीकडेच यारीस सेडन मोटारीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. यारीस मोटारीच्या विक्रीला म्हणावा तसा प्रतिसाद ग्राहकांचा न मिळाल्याने कंपनीने याबाबत निर्णय घेतला आहे. टोयोटा आता आपल्या मध्यम आकाराच्या सेडन कार्सवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही बोलले जात आहे. एप्रिलपासून फक्त 237 यारीस मोटारींचे उत्पादन घेण्यात आले आहे. पण खप नसल्याने अखेर 27 सप्टेंबरपासून उत्पादन थांबवण्याचे कंपीनीने निश्चित केले आहे.