वृत्तसंस्था/ होबार्ट
ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध असलेल्या महिलांच्या बिग बॅश टी-20 लिगसाठी भारताची यष्टीरक्षक आणि फलंदाज रिचा घोषने होबार्ट हरिकेन्स संघाबरोबर करार केला आहे. ऑस्ट्रेलियातील या स्पर्धेत सहभागी होणारी रिचा ही भारताची सातवी महिला क्रिकेटपटू आहे.
महिलांच्या बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेत भारताची स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या सिडनी थंडर संघाकडून तर शफाली वर्मा आणि राधा यादव सिडनी सिक्सर्स संघाकडून, जेमिमा रॉड्रीग्ज आणि हरमनप्रित कौर मेलबोर्न रेनेगेड्स संघाकडून खेळणार आहेत. आता रिचा घोष होबार्ट हरिकेन्स संघाकडून आगामी बिगबॅश क्रिकेट हंगामात खेळणार आहे. गेल्या वषी रिचा घोषने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण तिरंगी टी-20 मालिकेत केले होते. रिचाने अलीकडेच 18 व्या वर्षात पदार्पण केले आहे.