ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनातून मार्ग निघत नसल्याने शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळाले. या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून, 86 पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणात बुधवारी सकाळपर्यंत 15 FIR दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, टिकरी, सिंधू बॉर्डर आणि अन्य ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्यावर चढून युनियन आणि खालसा पंथाचे ध्वज फडकवत पोलिसांवर हल्ला केला. परिणामी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मात्र, दिल्ली पोलिसांनी शिताफीने आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळवले. दरम्यानच्या काळात जखमी झालेल्या 86 पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये, 18 पोलिसांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी रात्री तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला.