समितीच्या शुभम शेळकेंनी निर्माण केला नवा इतिहास : बेळगावला प्रथमच महिला खासदार, काँग्रेसने दिली कडवी लढत
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावची लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी म्हणजे जणू 20-20 क्रिकेट सामनाच झाल्याचे साऱयांनाच अनुभवयाला मिळाले. म. ए. समितीच्या उमेदवाराने राष्ट्रीय पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना चांगलाच घाम आणला. शेवटच्या फेरीपर्यंत मोठी चुरस निर्माण झाली. अखेर या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या मंगला सुरेश अंगडी यांनी बाजी मारली असून 5 हजार 240 मतांनी त्यांनी निसटता विजय मिळविला. मंगला अंगडी या बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत.
बेळगाव लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक यावेळी विविध कारणाने गाजली होती. या निवडणुकीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीनेही आपला उमेदवार दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित होते. तरी देखील यावेळी मतदानाची टक्केवारी घसरली होती. 56.02 टक्के मतदान झाले होते. एक्झीट पोलने मात्र भाजप विजयी होईल, असा अंदाज वर्तविला होता. एक्झीटपोलचा अंदाज खरा ठरवत भाजपने विजय संपादन केला आहे.
या निवडणुकीमध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीणमधील मतदानावरच उमेदवाराचे भवितव्य अवलंबून होते. त्यानुसारच हा निकाल लागला. भाजपच्या मंगला अंगडी यांना 4 लाख 36 हजार 868 ईव्हीएम तर 3 हजार 459 पोस्टल मते मिळाली. एकूण 4 लाख 40 हजार 327 मते त्यांना पडली आहेत. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 882 ईक्हीएम तर 2 हजार 205 पोस्टल मतदान असे एकूण 4 लाख 35 हजार 87 मतदान झाले आहे. म. ए. समितीचे शुभम शेळके यांना 1 लाख 16 हजार 923 ईव्हीएम तर पोस्टल 251 मते त्यांना पडली असून त्यांना एकूण मतदान 1 लाख 17 हजार 174 मते पडली आहेत. यावेळी नोटालाही तब्बल 10 हजार 563 मते देण्यात आली आहेत.
बेळगाव लोकसभा निवडणूक सर्वांनीची प्रति÷sची केली होती. या निवडणुकीत समिती रिंगणात उतरल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली. एकूण 18 लाख 21 हजार 614 मतदारांपैकी 10 लाख 11 हजार 616 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान कमी झाले होते. कोरोनाच्या भितीच्या छायेखाली मतदान प्रक्रिया पार पडली होती तर मतमोजणीही कोरोनाचे नियम पाळतच पार पडली.
मतमोजणीची प्रक्रिया संथगतीने
रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. मोजणीची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. मध्येच सर्व्हर डाऊनचाही व्यत्यय निर्माण झाला होता. सकाळी काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर मंगला अंगडी यांनी आघाडी घेवून तब्बल 41 फेरी अखेरपर्यंत त्यांनी 8 ते 10 हजार मतांची आघाडी ठेवली होती. त्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा आघाडी घेत 55 फेऱयांपर्यंत सलग मुसंडी मारली आणि 9 हजार 975 मतांची आघाडी त्यांनी मिळविली होती.
त्यानंतर अचानकपणे सतीश जारकीहोळी यांचे मताधिक्य कमी झाले. ते 7 हजार 163 वर आले. त्यानंतर पुन्हा खाली घसरले. मात्र, पुन्हा मताधिक्य वाढले आणि 9 हजार 14 मते घेऊन त्यांनी आघाडी मिळविली होती. मात्र, सायंकाळच्या सत्रात ती पुन्हा घसरली व ती 7 हजार 809 वर आली. त्यानंतर 4 हजार 944 वर आली, त्यानंतर केवळ 1680 वर येऊन ठेपली. आणखी एका फेरीमध्ये मंगला अंगडी यांना अधिक मते मिळाल्याने केवळ 488 मताधिक्य सतीश जारकीहोळी यांना जादा होते. त्यानंतर मात्र त्यांचे मताधिक्य कमी होत मंगला अंगडी यांनी मुसंडी मारली. त्यांनी 3 हजार 530 मताधिक्य मिळवून आघाडी कायम ठेवली. त्यानंतर त्यामध्ये वाढ होत 4 हजार 123 वर पोहोचली. आणि शेवटपर्यंत त्यांची बढत कायम राहिली आणि शेवटी 5 हजार 240 मतांनी त्या विजयी झाल्या.
यावेळची मतमोजणी म्हणजे जणू क्रिकेट मॅचचाच अनुभव प्रत्येकाला येत होता. अरभावीमध्ये काँग्रेसने मताधिक्य अधिक घेतले तर सर्वात कमी त्यांना बेळगाव दक्षिणमध्ये मिळाले आहे. भाजपने गोकाकमध्ये सर्वात जास्त मते घेतली आहेत. भाजपला सर्वात कमी बेळगाव उत्तरमध्ये मते घेतली आहेत. शुभम शेळके यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये अधिक मते घेतली आहेत. त्या खालोखाल बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तरमध्ये मतदान झाले आहे.
गोकाक मतदारसंघात भाजपची बाजी
भाजपने गोकाक मतदार संघामध्ये सर्वाधिक मते घेतली असून एकूण 87 हजार 307 मते मंगला अंगडी यांनी घेतली आहेत. काँग्रेसला त्या मतदार संघामध्ये 59,398 मते मिळाली आहेत. त्यामुळेच भाजपचा विजय झाला असून काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे.
विविध मतदार संघांतून राष्ट्रीय पक्षांना मिळालेली मते
मतदारसंघ | भाजप | काँग्रेस |
अरभावी | 55957 | 71700 |
गोकाक | 87307 | 59398 |
बेळगाव उत्तर | 38668 | 51427 |
बेळगाव दक्षिण | 53226 | 30369 |
बेळगाव ग्रामीण | 47688 | 47796 |
बैलहोंगल | 49616 | 49708 |
सौंदत्ती | 47997 | 64056 |
रामदुर्ग | 56909 | 58428 |
एकूण | 436868 | 432882 |
लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी
उमेदवाराचे नाव | पक्ष | पोस्टल मते | मिळालेली मते |
मंगला अंगडी | भाजप | 3459 | 4,40,327 |
सतीश जारकीहोळी | काँग्रेस | 2205 | 4,35,087 |
शुभम शेळके | म. ए. समिती | 251 | 1,17,174 |
विवेकानंद बाबू घंटी | कर्नाटक राष्ट्र समिती | 74 | 4,844 |
वेंकटेश्वर महास्वामीजी | हिंदुस्थान जनता पार्टी | 60 | 2,015 |
मरलिंगण्णावर सुरेश बसाप्पा | कर्नाटक कार्मिकर पक्ष | 71 | 2,021 |
आप्पासाहेब श्रीपती कुरणे | अपक्ष | 24 | 1,364 |
नागाप्पा कळसण्णावर | अपक्ष | 24 | 3,006 |
श्रीकांत पडसलगी | अपक्ष | 41 | 4,388 |
गौतम यमनाप्पा कांबळे | अपक्ष | 24 | 1,390 |
नोटा | — | 68 | 10,631 |
खराब झालेली मते | – | – | 546 |