प्रतिनिधी /म्हापसा
वरगाव पिळगाव येथील पंचशताब्दी वर्षाचा इतिहास लाभलेल्या श्री चामुंडेश्वरी मंदिराला मुंबई ठाणा येथील उद्योजक एन.के.टी ठाणावाला चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी दानशूर म्हणून ओळखले जाणारे डॉ. शेट नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी सदिच्छा भेट देऊन जगदंबा चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी त्यांचे मंदिरात स्वागत केले. त्याप्रसंगी देवस्थानचे मुखत्यार दिपक गोवेकर उपस्थित होते. देवस्थानचे पुजारी श्रीनिवास सायनेकर यांनी त्यांच्याहातून अखंड जनसेवा व दान घडत राहो अशी प्रार्थना केली. त्यानंतर अध्यक्ष तुषार टोपले यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सप्तरंगी, सप्तगुणी जय भगवान शेट डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणेवाला यांना मुंबई, ठाणा, गुजरात अशा भागात लोक त्यांना दानशूर तर संत त्यांना धर्मात्मा म्हणून ओळखतात. त्यांनी शाळा, कॉलेज काढल्या आहेत. आज लाखो मुलांना शिक्षणाचे दान देत आहेत तसेच त्यांनी धनलक्ष्मीबेन नानजीभी ठक्कर ठाणावाला हॉस्पिटल ठाणे येथे रुग्णाच्या सेवेसाठी कार्यरत ठेवले आहे. सभागृहे, अतिथीगृह असे अनेक उपक्रम त्यांनी समाजासाठी राबविले आहेत. मानवी मनाची पूजा हे त्यांचे ध्येय आहे.