वेंगुर्ले /वार्ताहर-
ठाणे कासारवडवली येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत डेडलिफ्ट 2022 स्पर्धेत ठाण्याचा आदित्य भट याने स्ट्रॉंग मँन हा किताब पटकावला. या स्पर्धेचे प्रमुख परीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय पाँवर लिफ्टींग पंच दिलीप नार्वेकर यांनी काम पाहिले.
ठाणे कासारवडवली येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग वेल्फेअर असोसिएशन ठाणे प्रस्तुत जिल्हा पॉवरलिफ्टींग डेडली स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्गातील राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग कोच दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत 160 खेळाडूंचा सहभाग होता. ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टींगचे अध्यक्ष संभाजी सूर्यराव व सचिव सुरेंद्र महाडिक खजिनदार रवींद्र चव्हाण तसेच ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार व छत्रपती पुरस्कार प्राप्त स्ट्रॉंग में ऑफ इंडिया किताब विजेते रामदास खरात, छत्रपती पुरस्कार विजेत्या व स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त लक्ष्मी ठाणेकर यांचा यावेळी समावेश होता.