औंध / वार्ताहर :
आसवली ता खंडाळा गावचे उपसरपंच नवनाथ ढमाळ यांची जागतिक रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे.
22 ते 27 फेब्रुवारी अखेर इस्तंबूल (तुर्की) येथे जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने 2022 वर्षातील पहिलीच जागतिक रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धा होणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे वतीने स्पर्धेसाठी पंच म्हणून नवनाथ ढमाळ यांची निवड करण्यात आली आहे.
ढमाळ यांनी यापूर्वी आशियाई कुस्ती स्पर्धा, जागतिक कुस्ती स्पर्धा आणि अनेक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे आणि आसवली ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.