प्रतिनिधी/ सातारा
शहरातील एका कामाचे टेंडर एका ठेकेदाराने घेतले होते.ठेका संपल्यावर उरलेल्या एक महिन्याचे बिलच पालिकेने अडवून ठेवले असल्याने ठेकेदाराने चक्क अधिकायांनी किती आणि कुठे पैसे घेतले, मागितले याच्या सर्व ऑडिओ, व्हिडीओ क्लिपा आहेत.बिल काढले नाहीतर सीडी तयार करून पालिकेच्या दारात विकायला बसेन असे ठणकावत चक्क एक ऑडिओ क्लिप ऐकून ही दाखवली.या प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी तांतरले असून एका जेष्ठ नगरसेवकास याचा सल्ला मागितला.त्यांनी ही अफलातून सल्ला दिल्याची चर्चा आहे.
सातारा पालिकेत ज्या प्रमाणे इतर शासकीय कार्यालयात टक्केवारीचा कारभार चालतो तसाच सुरू आहे.एका कामाकरता एका ठेकेदाराकडून दर महिन्याला काही रक्कम पालिकेतून घेतली जात असायची.त्याने घेतलेले काम हे कोरोनाच्या अगोदर संपले.मात्र,पालिकेने त्या ठेकेदाराचे शेवटच्या महिन्याचे बिल दिले नाही.कामगारांना सध्या लॉक डाऊनच्या काळात तरी राहिलेला पगार देता येईल या भावनेतून तो ठेकेदार पालिकेकडे पाठपुरावा करत होता.मात्र, पालिकेच्या त्या विभागातून काहीच हालचाल होत नसल्याचे पाहून तो ठेकेदार शुक्रवारी पालिकेत गेला होता.त्याने एका अधिकायांस बिल नका काढू पण माझ्याकडे सगळे पुरावे आहेत.त्याची सीडी तयार करून पालिकेसमोर विकायला बसतो,असे ठणकावत एक ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली.त्यात कोणाचे किती टक्के,कोणाचे किती मागणी करत असल्याचे ऐकून त्या अधिकायांची तंतरली आहे.पालिकेच्या काही अधिकायांनी लगेच ही बाब एका हुशार जेष्ठ नगरसेवकाच्या कानावर घातली.त्या नगरसेवकाने ही लगेच अफलातून अजब सल्ला दिला.त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज असलेल्या अधिकायाची बदली इतर विभागात करायची.मात्र या प्रकारामुळे चांगलीच पालिकेत गडबड उडाली आहे.