मुंबई
डाबर इंडियाने मंगळवारी जूनअखेरच्या तिमाहीतील आकडेवारी जाहीर केली असून याअंतर्गत कंपनीने 28 टक्के वाढीव नफा कमावला असल्याचे दिसून आले आहे. कंपनीने एप्रिल-जून या कालावधीत 438.3 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे तर मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 341 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचे उत्पन्न 32 टक्के वाढून 2 हजार 611 कोटी रुपयांवर पोहचले आहे. जे मागच्या वर्षी समान कालावधीत 1980 कोटी रुपये इतके होते.