शिल्पा नाईक यांना विश्वास.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली मतदारसंघातील भाजपची उमेदवारी अद्याप पक्षाकडून अधिकृतपणे जाहिर झालेली नाही. या उमेदवारीवर यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत आपलाच हक्क असून ती आपल्यालाच मिळणार असा आपल्याला विश्वास आहे. गेल्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी डावलूनही आपण पक्षाबरोबर एक नि÷ावंत कार्यकर्त्या म्हणून म्हणून नाव राखले आहे. त्यामुळे यावेळी पक्ष आपली निराशा करणार नाही. तसेच आपल्या भुमिकेवर कोणीही लक्ष ठेवण्याची गरजही नाही, अशी प्रतिक्रिया लाटंबार्सेच्ता माजी जिल्हा पंचायत सदस्या तथा भाजपच्या महिला सरचिटणीस शिल्पा नाईक यांनी तरूण भारतशी बोलताना व्यक्त केली.
गेल्या 2017 सालच्या निवडणुकीत डिचोलीच्या भाजप उमेदवारीवर आपलाच हक्क होता. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजेश पाटणेकर यांना सदर उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी आपण आपली भुमिका उघड करताना आपण पक्षाबरोबर असून पाटणेकर यांना काम करणार नसल्याचे जाहिर केले होते. परंतु त्यानंतर निवडणुकीला अवघेच दिवस असताना आपण पक्षासाठी प्रचारकार्यात सहभागी झाल्यानंतर पाटणेकर यांचा 666 मतांनी विजय झाला होता. हि बाबही तितकीच महत्वाची आहे. असे शिल्पा नाईक म्हणाल्या.
2017 च्या निवडणुकीनंतर आपण भाजप पक्षासाठी सक्रियपणे कार्य करीत आहे. याच कार्याची दखल घेत आपणास प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. डिचोली मतदारसंघात पक्षाचे काम तळागळात पोहोचविण्यासाठी आपले कार्यकर्त्यांसह काम सुरूच आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघातील उमेदवारीसाठी आपण पक्षाच्या विविध स्थानिक आणि केंद्रीय वरि÷ नेत्यांच्या भेटी घेतच आहे. आपण कधीही कोणत्या आमिषांना बळी पडलेले नसून यापुढेही पडणार नाही. पक्षाची नि÷ावंत कार्यकर्ता म्हणून नाव राखलेले आहे.
तसेच पक्षाच्या बळावर कोणत्याही सरकारी महामंडळ किंवा अन्य ठिकाणी पदे भुषविलेली नाहीत. केवळ पक्षकार्याला प्राधान्य दिलेले आहे. अशा परिस्थितीत पक्ष आपली निराशा करणार नाहीच. यावेळी विधानसभा निलडणुकीतील उमेदवारी हा आपलाच हक्क आहे. आणि पक्ष आपणास तो देणारच असा आपणास ठाम विश्वास आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
आपण पक्षाबरोबरच आहे व राहणार, आपल्या भुमिकेकडे कोणीही लक्ष ठेवण्याची गरज नाही. डिचोलीत सध्या लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचे राजकारण सुरू आहे. या राजकारणाला लोक बळी पडणार नाही. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि लोक आपल्याबरोबरच असून भाजपची उमेदवारी मिळताच सर्वजण आपल्या विजयासाठीच झटणार आहे. असा विश्वासही शिल्पा नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.