71 खाटांची सुविधा. केशव सेवा साधना स्कुलमध्ये सुविधा. ऑक्सजिन सुविधाही उपलब्ध होणार
डिचोली/प्रतिनिधी
वाठादेव सर्वण डिचोली येथील केशव सेवा साधना संस्थेच्या विद्यालयात कोवीड केअर सेंटर व स्टेप अप हॉस्पिटल स्थापन करण्यात आलेले असून या ठिकाणी कोवीड रुग्णांवर प्राथमिक उपचार तसेच सुमारे दहा ऑक्सजिन सुविधा प्राथमिक स्थरावर पुरवण्याची सोय करण्यात आली आहे. हे कोवीड निगा कें?द्र आणि स्टेप अप इस्पितळ एक दोन दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
डिचोलीच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर,
डॉ शेखर साळकर, डॉ गौरीश पालव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपचार होतील अशी माहिती डिचोली मामलेदार प्रवीनजय पंडित यांनी दिली. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांचीही उपस्थिती होती
मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसात हे केंद्र सज्ज केलेले असून डॉ. मेधा साळकर व त्यांची टीम यांचेही सहकार्य लाभले आहे. डिचोलीत रुग्णां?ची संख्या वाढत असून कोवीड उपचार केंद्राची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने सर्व ती सुविधा निर्माण करण्यात आल्याचे पंडित यांनी सांगितले. याठिकाणी रुग्णांना सर्व ती सुविधा पुरवता यावी याची काळजी घेण्यात आली आहे. या ठिकाणी कोवीड पॉझिटीव्ह रुग्णां?वर उपचार सुरू होतील असेही सांगण्यात आले.
डॉ शेखर साळकर व डॉ पालव, डॉ मेधा साळकर यांच्या देखरेखीखाली गरजेनुसार रुगणावर उपचार होतील. प्राथमिक स्थरावर दहा ऑक्सजिन बेड सुविधा केली असून कालांतराने ती वाढवून 20 करण्यात येईल.
मागच्या वषी या केंद्रात कोवीड रुगणावर प्राथमिक उपचार व 14 दिवस आयसोलेशन सेंटर म्हणून उपयोग केला होता. त्यावेळी बहुतेक परप्रांतीय मजूर या ठिकाणी होते. या वेळेला या ठिकाणी सर्व सुविधा बहाल करण्यात आल्याने डिचोली व परिसरातील रुगणावर उपचार व इतर बाबतीत मदत करणे सोपे होणार आहे. असे उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांनी सांगितले.
राज्यात सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठय़ा वेगाने वाढत चालली असल्याने राज्यातील सर्व प्रमुख इस्पितळांवर ताण आलेला आहे. लोकांच्याही तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने डिचोलीतच अशा प्रकारचे केंद्र कार्यान्वति केल्याने त्याचा लाभ प्राथमिक स्थरावरील रूग्णांयावर होणार आहे. राज्य सरकार या महामारीत कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अविरतपणे काम करीत आहे. तरीही लोकांनी स्वतः इस्पितळात दाखल होण्याची परिस्थिती ओढवू नये, सरकारने लागू केलेल्या सर्व कोवीड मार्गदर्शक तत्वा?चे कडकपणे पालन करून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन सभापती राजेश पाटणेकर यांनी यावेळी केले.