सुदैवाने चालक थोडक्मयात बचावला. किरकोळ जखमेवर निभावले. काही काळासाठी वाहतूक ठप्प.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली ते साखळी या मुख्य रस्त्यावर कुळण येथे एक भलेमोठे गुलमोहराचे झाड एका धावत्या मारूती व्हेनवर कोसळल्याने सदर वाहनाचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने वाहनामधील चालकाचा थोडक्मयात जिव वाचला. त्याला किरकोळ जखम झाली. पायाला मार बसल्याने त्याला लागलीच इस्पितळात नेण्यात आले. या दुर्घटनेमुळे डिचोली ते साखळी या मार्गावरील वाहतूक मात्र काही काळासाठी ठप्प झाली.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री 7.45 वा. च्या सुमारास डिचोलीहून साखळीच्या दिशेने जाणाऱया जीए 05 बी 3717 या मारूती व्हेन गाडीवर कुळण येथे धोकादायक स्थितीत उभे असलेले गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेमुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. सदर झाड संपूर्ण रस्ताभर पडल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. तात्पुरती वाहतूक कारापूर सर्वण गावातील अंतर्गत रस्त्यावरून वळविण्यात आली होती.
यावेळी सदर ठिकाणी दाखल झालेल्या लोकांनी गाडीच्या चालकाला मदतीचा हात दिला आणि त्याला लागलीच उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले. डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर व पोलीस कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूकीची परिस्थिती हाताळली. तसेच डिचोली अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविण्याचे किम हाती घेतले. लगेच रस्त्याची एक बाजू साफ करून वाहतूक सोडण्यात आली.
या मार्गावर अनेक धोकादायक झाडे आजही उभी आहेत. मात्र त्याकडे अद्याप कोणाचेही लक्ष नाही. पावसाळय़ात तर हि झाडे रस्त्यावर पडतच असतात. सुदैवाने मोठी घटना घडलेली नसल्याने शासकीय यंत्रणांना अजूनही जाग आलेली नाही. काल घडलेली घटना ही गंभीरच होती. चालकाचे सुदैव म्हणून अनर्थ टळला. आतातरी शासनाने जागृत होऊन धोकादायक असलेली झाडे हटवावी अशी मागणी करण्यात येत आहे.