कॉलिस गाडीचा दर्शनी भाग चक्काचूर
पेडणे / प्रतिनिधी
वळपे पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर पुलावर सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान मालवाहू ट्रक व कॉलीस या चार चाकी वाहनाची धडक बसून कॉलीस गाडीचा दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन कॉलीस चालक गंभीर जखमी झाला.
सोमवारी सकाळी 6 च्या दरम्यान पणजीहून महाराष्ट्रात देवदर्शनासाठी जात असताना वळपे येथे पंचायत कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर पुलावर हा आपघात झाला. महाराष्ट्रात राज्यातून आलेला एम.एच 07 ऐ.जे 1319 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक हा दयानंद प्रभू देवगड हा चालक पणजीच्या दिशेने जात असताना पणजीहून महाराष्ट्र राज्यात जात असलेल्या जी.ए 01 – एस- 2236 या कॉलीस या गाडीची धडक समोरा समोर दोन्ही वाहनाची झाली. ही धडक दोन्ही वाहनाच्या चालकाच्या बाचूने बसल्याने या धडकेत कॉलीस गाडीचा चालक आनंद मलीमाट हा गंभीर जखमी झाला. का?लिस गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर मालवाहू ट्रकचेही नुकसान झाले. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. जखमीने 108 रुग्णवाहिकेने इस्पितळात नेण्यात आले.