सर्व खात्यांच्या अधिकाऱयांची उपस्थिती. नगरसेवक, पंचसदस्यांनी मांडल्या समस्या आणि सुचना. मोन्सनपूर्व कामात कोणतीही हयगय नको. साळात पूर स्थितीवर विशेष लक्ष ठेवण्याची सुचना.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली मततारसंघात येणाऱया पावसाळय़ात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास शासकीय पातळीवरील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. शासकीय यंत्रणेकडून बचावकार्याअभावी लोकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व संबंधित व जबाबदार शासकीय अधिकाऱयांनी विशेष सतर्कता बाळगावी. तसेच साळ या गावत यावेळी पुरस्थिती उदभवू नये यासाठी जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी तिळारी धरणातील पाणी विसर्गावर विशेष लक्ष ठेवावे. त्यासाठी येणाऱया आठवडय़ात साळ येथे सर्व संबंधित अधिकाऱयांसह प्रत्यक्षात पाहणी केली जाणार आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी सांगितले.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांच्या अध्यक्षतेखाली डिचोली मतदारसंघातील मोन्स?नपूर्व कामे आणि आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावर महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, डिचोली उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर, सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर, डिचोलीचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर या बैठकीस नगरसेवक, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, विविध सरकारी अधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
साळ गावात पूरप्रतिबंधक संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव
साळ गावाला दरवषी तिळारी धरणाच्या अतिरिक्त पाण्याचा मार बसतो. आणि गावात दरवषी पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक शेतकऱयांचे व लोकांच्या घरांचेही अतोनात नुकसान होते. यावर उपाययोजना म्हणून साळ गावात संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. परंतु सध्या या समस्येवर मात करण्यासाठी राज्याच्या जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांना समवेत घेऊन साळ गावात प्रत्यक्षात पाहणी केली जाणार आहे. तसेच तिळारी धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गावर लक्ष ठेवण्याची सुचना संबंधित अधिकाऱयां?ना देण्यात आली आहे. असे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यां?नी सांगितले.
डिचोली शहरातील नाला व नदीतील गाळ उपसण्याची मागणी
डिचोली शहरातून वाहणारी नदी व लामगाव येथून डिचोली नदीपर्यंत येणारा नाला यातील गेल्या काही वर्षांपासून गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे कधिक पाऊस पडून नदीची पातळी वाढल्यास शहरातील सर्व.लहान मोठय़ा नाल्यांमधील पाणी वाढते व पुरसदृष्य स्थिती निर्माण होते. त्यासाठी नदी व नाल्यातील गाळ तातडीने उपसण्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी नगरसेवक अनिकेत चणेकर यांनी केली. त्यावर आमदार डॉ. शेटय़? यांनी जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांना याविषयी लक्ष घालण्याची सुचना केली.
आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवावी
पावसाळा सुरू होताच विविध भागांमध्ये विविध समस्या निर्माण होतात. यावेळी लोकांना शासकीय पातळीवरून आवश्यक असलेली सर्वती मदत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी डिचोली मामलेदार कार्यालयाकडून आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सज्ज करण्यासाठी आतापासूनच सुरूवात करावी. ऐनवेळी धावपळ करू नये. असे आमदार डॉ. शेटय़? यां?नी मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांना सांगितले.
धोकादायक झाडे हटविण्याची प्रक्रिया गतीमान करावी
शहराय तसेच ग्रामीण भागात बरीचशी जुनाट झाडे आज धोकादायक स्थितीत व कोसळण्याच्या उभी आहेत. सदर झाडे पाऊस सुरू होण्यापूर्वी हटविण्यात यावी. त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयातून प्रक्रिया गतीमानपणे करण्यात यावी अशी सुचना यावेळी नगरसेविका दिपा शिरगावकर, अँड. रंजना वायंगणकर, सतीश गावकर यांनी मांडली. आपत्कालीन व्यवस्थापनाला रस्त्याच्या शेजारी असलेली धोकादायक झाडे तत्काळ हटविण्याचे अधिकार आहेत. तर काही खासगी जागेमधील झाडे हटविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात वेळ जातो, असे यावेळी सांगण्यात आले. तर सदर प्रक्रिया मानवहित जपताना वेगवानपणे करण्यात यावी, अशी सुचना आमदर डॉ. शेटय़? यांनी यावेळी दिली.
नाले गटारे वेळेत साफ करून घ्या
सर्व पंचायत तसेच नगरपालिका क्षेत्रातील गटरांची साफसफाई पावसाळय़ापूर्वी करून घ्यावी. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या पारंपरिक ओहळ, नाल्यांची साफसफाई करण्यात यावी. गटरे, नाल्यांमधील कचऱयामुळे रस्त्यांवय पाणी येऊन लोकांना त्रास होऊ नये याची प्रत्येक लोकप्रतिनिधींनी काळजी घ्यावी. जलस्रोत खात्यानेही या कामांकडे लक्ष पुरवावे असे आमदार डॉ. शेटय़? यां?नी सांगितले.
पावसाळय़ात वीजेची समस्या मोठय़ा प्रमाणात उदभवत असते, यावर वीज खात्यांच्या अधिकाऱयांना सुचना करण्यात आली. अनेक ठिकाणी कंडक्टर्स तसेच ट्रान्स्फ?र्मर जुने झाल्याने उदभवणाऱया समस्यावर वीज खात्याकडे आपण बोलणार असल्याचे आमदारांनी सांगितले. पाणी पुरवठा सुरळीत व्हवा व लोकांना त्रास होऊ नये यासाठी पाणी पुरवठा विभागाने विशेष लक्ष घालावे. डिचोली अग्निशामक दलाकडून चांगल्या प्रकारचे काम होत असून पावसाळय़ातील आव्हानासाठी सज्ज व्हावे. तसेच अनेक ठिकाणी खराब बनलेल्या रस्त्यांची पावसापूर्वी डागडुजी करण्यात यावी. अशा सुचना यावेळी आमदार डॉ. शेटय़? यांनी अधिकाऱयांना दिल्या.