रियल टाईम पेमेन्टच्या देवाणघेवाणीत भारत अव्वल- डिजिटल प्लॅटफॉर्मचा मिळतोय फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या ऑनलाईन व्यवहारावर भर दिला जात असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आता संपूर्ण जगातील पहिल्या दहा देशांमध्ये रियल टाईम पेमेन्टच्या देवाणघेवाणीमध्ये भारत अव्वल स्थानी राहिला असल्याची माहिती आहे. तर दुसऱया स्थानी चीन असून अमेरिकेसारखा विकसित देश याबाबत 9 व्या स्थानी असून जपान सात नंबरवर असल्याची माहिती आहे.
आकडेवारीचा आलेख पाहिल्यास यामध्ये वर्ष 2020 मध्ये भारतामध्ये 2,547 कोटी रियल टाईम देवाणघेवाण झाली आहे. तर याच कालावधीत चीनमध्ये 1,574 कोटीची देवाणघेवाण झाली आहे. यानंतर दक्षिण कोरिया तिसऱया नंबरवर असून साधारणपणे 601 कोटी रुपयाची उलाढाल झाल्याची नोंद आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात व्यवहार
भारतामध्ये लोकसंख्येचा दर हा सरासरी अधिक असल्यामुळे होणाऱया व्यवहारांची देवाणघेवाण ही अधिकची होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे रियलटाइम देवाण घेवाणीत वाढ झाली आहे. यामधील कोणतेही व्यवहार हे डिजिटल असल्यास त्यात नेट बँकिंग किंवा रियल टाईम व्यवहारात होतात. भारतामध्ये वर्ष 2020 मध्ये या स्वरुपातील व्यवहार एकूण 25 अब्जपेक्षा अधिक झाल्याची नोंद आहे.