ओटीटीबद्दल नित्या मेननने काढले उद्गार
ब्रीद-इन टू द शॅडोज या सीरिजमधील अभिनयासाठी कौतुक मिळविल्यानंतर आता त्याच्या सीझनमध्ये देखील अभिनेत्री नित्या मेनन दिसून येणार आहे. सोनी लिव्हवर प्रदर्शित तमिळ चित्रपट ‘स्कायलॅब’द्वारे तिने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
नित्याने पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले हेते. डिजिटल प्लॅटफॉर्मने प्रादेशिक कलाकारांच्या अडचणी कमी केल्या आहेत. ब्रीदचे दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी माझे काही दाक्षिणात्य चित्रपट पाहिले होते. त्यांन भाषांची अडचण नाकारत माझी या सीरिजकरता निवड केली. डिजिटल प्लॅटफॉर्मने भाषिक भिंती तोडल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्याच्या अडचणी कमी झाल्याचे उद्गार नित्याने काढले आहेत.
विशेष प्रकारचा चित्रपट निर्माण करण्याची इच्छा असल्यास निर्मिती हे याचे सर्वात सशक्त माध्यम आहे. माझ्यासाठी चित्रपट निर्मिती अत्यंत चांगला अनुभव राहिला असल्याचे तिने म्हटले आहे. नित्या मेनन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहे. तिचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. तसेच तिने अक्षय कुमारसोबत एका हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.