हंसल मेहता यांची नवी वेब सीरिज
नेटफ्लिक्सने स्वतःची नवी वेबसीरिज ‘स्कूप’ची घोषणा केली आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार आहेत. स्कूप ही सीरिज पत्रकार जिग्ना वोरा यांचे पुस्तक बिहाइंड द बार्स इन बायकुला-माय डेज इन प्रिजवर बेतलेली आहे. सध्या या सीरिजच्या कलाकारांची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत असल्याचे समजते. तिने सीरिजचे चित्रिकरण सुरू पेले आहे.
काही वर्षांपूर्वी जिग्ना यांचे नाव मुंबईतील एका वरिष्ठ गुन्हेपत्रकाराच्या हत्येप्रकरणी समोर आले होते. जिग्नावर हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप झाला होता. या हत्येचे कनेक्शन अंडरवर्ल्डशी जोडले गेलेले होते.
हंसल मेहता यांनी यापूर्वी स्कॅम 1992-द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सीरिज सादर केली होती. ही सीरिज अत्यंत यशस्वी ठरली होती. स्कॅम 1992 ही सीरिज पत्रकार सुचेता दलाल आणि देवाशीष बासू यांच्या पुस्तकावर आधारित होती. आता स्कॅम प्रँचाइजीची दुसरी सीरिज स्कॅम 2003-द क्यूरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी लवकरच प्रदर्शित होणार आहे.