मार्चमध्ये भीम युपीआयच्या मदतीने 273 कोटींचे व्यवहार- वर्षभरात व्यवहार 118 टक्क्यांनी मजबूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना कालावधीच्या प्रारंभापासून देशातील डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात तेजी प्राप्त झाली आहे. हा कल गेल्या काही दिवसांपासून वाढतच असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये मागच्या महिन्यात देशातील भीम युपीआय व्यवहारांनी नवा विक्रम प्राप्त केला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीआयसी)च्या आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये देशात 273 कोटी भीम युपीआय व्यवहार झाले आहेत. हा आकडा मार्च 2020 मध्ये 125 कोटीच्या व्यवहाराचा होता, जो चालू वर्षात दुप्पट झाला आहे.
एनपीसीआयच्या माहितीनुसार मार्च 2021 मध्ये युपीआयच्या आधारे 5,04,886 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. मार्च 2020 मध्ये ही देवाणघेवाण 2,06,462 कोटी रुपयांवर राहिली आहे.
फास्टॅगमधून 19.32 कोटींचे व्यवहार
मार्च 2021 मधील आयएमपीएसच्या रियल टाईम सेटलमेंटच्या आधारे 36.31 कोटीचे व्यवहार झाले. यामध्ये 3,27,234.43 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारत बिलपेच्या आधारे 3.52 कोटीचे व्यवहार झाले असून ही उलाढाल 5,195.76 कोटींवर राहिली होती. हीच स्थिती फास्टॅगची पाहिल्यास यामध्ये 19.32 कोटीच्या व्यवहारासह 3,086.32 कोटी रुपयांची देवाणघेवाण करण्यात आली आहे.
एनयूइ स्थापनेसाठी सादर
एनपीसीआयसारखी न्यू अम्ब्रेला एंटिटि (एनयूइ) याची स्थापना करण्यासाठी खालील ग्रुपकडून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
? ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, ऍमेझॉन,व्हीजा, पाइन लॅब्स आणि बिलडेस्क
? टाटा ग्रुपची फरबाइन, कोटक बँक, एचडीएफसी बँक,एअरटेल डिजिटल, फ्लिपकार्ट, मास्टरकार्ड आणि पेयू
? पेटीएम, ओला फायनाशिअर, इपीएस, इंडसइंड बँक, सेंट्रम फायनान्स आणि जीटा पे
? रिलायन्स जिओ, इंफीबीमची कंपनी सो हम भारत
? इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँक आणि रेजर पे