नवी दिल्ली
फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आता शाओमीचा प्रवेश झाला असून या कंपनीची स्पर्धा थेट सॅमसंग फोल्डेबल बरोबर राहणार आहे. यामध्येच आता सॅमसंग आपला फोल्ड 2 स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड 2 5जी फोनची एक्स फॅक्ट्रीची किमत 2125 डॉलर (1,55,700 रुपये होती. ज्यामध्ये कपात करुन 1675 डॉलर (जवळपास 1,22,700 रुपये) केलेली आहे. मागील महिन्यात सॅमसंगने गॅलेक्सी झेड फ्लिप 5 जी क्लॅम्शेल टाईप फोल्डेबल स्मार्टफोन असून यांची किमतही कपात केली होती. योनहाप यांच्या अहवालानुसार इंडस्ट्रीजशी जोडलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सॅमसंगने आपले फोल्डेबलच्या स्मार्टफोनच्या किमतीत कपात करुन उत्पादनांचा विस्तार करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.