2021 मध्ये 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक : तब्बल 175 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ लंडन
ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ भारतातही बऱयापैकी पसरलेली आहे. कोरोना काळात तर अनेकांचा भर हा ऑनलाइन शॉपिंगवर दिसला आहे. जागतिक स्तरावर उद्योग विश्वात होणारी गुंतवणूक पाहता भारत हा डिजिटल खरेदीत किंवा शॉपिंगमध्ये दुसऱया नंबरचा देश ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 2021 मध्ये डिजिटल शॉपिंगच्या क्षेत्रामध्ये 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. 2020 च्या तुलनेत पाहता 175 टक्के गुंतवणूक वाढली आहे. त्यावेळी 8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये झाली होती. जागतिक पातळीवर डिजिटल खरेदीच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होणारा भारत हा दुसऱया नंबरचा देश ठरला आहे. या यादीत अमेरिका अग्रस्थानावर राहिली आहे.
कोणता देश आघाडीवर
मागच्या वर्षी अमेरिकेमध्ये या क्षेत्रामध्ये 51 अब्ज डॉलर्स, चीनमध्ये 14 अब्ज डॉलर्स आणि ब्रिटनमध्ये 7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. भारतातील गुंतवणुकीचा विचार करता 14 अब्ज डॉलर्ससह बेंगळूर शहर आघाडीवर राहिले आहे. 4 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह गुरुग्राम 7 व्या आणि 3 अब्ज डॉलर्ससह मुंबई 10 व्या स्थानी आहे. डिलरुम डॉट कॉम यांनी या संदर्भातले आकडेवारी दिली आहे. कोविड-19 महामारीच्या वेळी ऑनलाईन खरेदीवर मोठय़ाप्रमाणात वाढ दिसली होती. याचा लाभ ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनी सढळपणे उचललेला दिसला.