क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
वेणुग्राम सायकलिंग क्लब बेळगाव, इनरव्हील क्लब बेळगाव, केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात प्रथमच डुआथ्लॉन (धावणे व सायकलिंग) स्पर्धेत विक्रांत होनगेकर, विनायक जांबोटकर, श्रेया पाटील, मेघ शिवलकर, गुलजार ए. एम., मुबारक बी., श्रेया सुंठणकर, संतोष विभुतहल्ली यांनी विजेतेपद पटकाविले आहे.
या स्पर्धेत 240 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. रविवार दि. 10 जानेवारी रोजी केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सकाळी 6 वा. प्रमुख पाहुणे केएलईचे डॉ. सतीश धामणकर, उद्योगपती अजित क्षीरसागर, डॉ. राजेश पवार, बी. जी. गोडसे, जोतिबा जाधव, मंजिरी पाटील, लता कित्तुर, संतोष शानभाग आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सतीश धामणकर व अजित क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जेएनएमसी महाविद्यालय, निसरंग हॉटेल, सर्व्हिस रोड, कॅन्सर हॉस्पिटल येथून बुडा ऑफिस, राष्ट्रीय महामार्ग, श्रीनगर गार्डन, केपीटीसीएल हॉल, राष्ट्रीय महामार्ग व त्याच मार्गावरून परत केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सांगता झाली.
स्टॅंडर्ड विभाग दुसरा गटासाठी केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जेएनएमसी कॉलेज, निसरंग हॉटेल, सर्व्हीस रोड, राष्ट्रीय महामार्ग, यमनापूर, काकती, होनगा, परत काकती, हिंडाल्को ब्रिज, राष्ट्रीय महामार्ग, केपीटीसीएल हॉल, श्रीनगर गार्डन, निसरंग हॉटेल, जेएनएमसी महाविद्यालय येथून केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नेहरूनगर येथे सांगता झाली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : स्टॅंडर्ड गट टीम इव्हेंट – 10 किमी रन (40 किमी सायकलींग, 5 किमी रन) स्पर्धेत विक्रांत होनगेकर, विनायक जांबोटकर यांनी प्रथम क्रमांक, बाळाप्पा कुगजी, रणजीत कणबरकर यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. महिला सोलो गट : 1) सृष्टी पाटील 2) नंदा अष्टेकर 3) नम्रता उपाध्ये. पुरूष सोलो गट : 1) मेघ शिवलकर, 2) जयदीप छुझा, 3) किरण गायकवाड.
स्प्रिंट रेस (5 किमी रन, 20 किमी सायकलींग, 2.5 किमी रन) टीम इव्हेंट – 1) गुलझार ए.एम., मुबारक डी., 2) रोहन हारगुडे, नारायण अष्टेकर. महिला सोलो – 1) श्रेया सुंठणकर, 2) रिया कडोलकर, 3) ऋतुजा हंडे. पुरूष सोलो – 1) संतोष विभुतहल्ली, 2) चिदंबर देसूरकर, 3) आदर्श कुगटोली.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, पदके, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व सहभागी झालेल्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सतीश पाटील, महेश चौगुले, अरूण पाटील, शीतल एस. के., सचिन अष्टेकर, सुमित वेर्णेकर, मिलिंद पावशे, सचिन उपाध्ये, संजय मगदुम, कल्लाप्पा पाटील, मयुरेश कारेकर, अभिजित पी., धिरज भाटी, महेश जवळी, राजु नायक, मनोज गोंदकर, जीमी खुराना, महेश बनसोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.