नूतन पदाधिकाऱयांचीही निवड
प्रतिनिधी /बेळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी उत्सव महामंडळाची बैठक झाली. यंदाची जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. याचवेळी नूतन पदाधिकाऱयांचीही निवड करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे ही बैठक झाली. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता सम्राट अशोक चौक ते कसाई गल्ली, मार्केट पोलीस स्टेशन, चव्हाट गल्ली, चन्नम्मा चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत भीमज्योतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ज्योतीचे स्वागत करण्यात येणार असून तेथून काळी आमराई, कंग्राळ गल्ली मार्गे धर्मवीर संभाजी चौकपर्यंत जाऊन या ज्योतीची सांगता होणार आहे.
भीमज्योतीच्या मिरवणुकीनंतर चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, याच बैठकीत उत्सव महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी यल्लाप्पा कोलकार, उपाध्यक्षपदी सुधीर चौगुले व सिद्राय मेत्री, सेपेटरीपदी कृष्णा कांबळे, उपसेपेटरी म्हणून रवि बस्तवाडकर, खजिनदारपदी संतोष हलगेकर, जनसंपर्क प्रतिनिधी म्हणून दुर्गेश मेत्री, संतोष कांबळे, महादेव हादीमनी, शंकर कांबळे, बाबू पुजारी यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत दलित नेते मल्लेश चौगुले, महामंडळाचे माजी अध्यक्ष व रेव्हेन्यू बँकेचे अध्यक्ष बसवराज बल्लुगोळ, सिद्धाप्पा कांबळे, मल्लेश कुरंगी, अर्जुन देमट्टी, गजानन कांबळे, महादेव तळवार, मल्लाप्पा तळवार, दीपक मेत्री, बाबू पुजारी, जीवन कुरणे, महेश कोलकार, मोहन कांबळे, सुनील बस्तवाडकर, गजू धरनाईक, शंकर कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.