वार्ताहर / सावंतवाडी:
येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अभिजीत चितारी यांना पुन्हा सावंतवाडीत आणावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रुग्णालयाचे अधिकारी डॉ. उत्तम पाटील यांना घेराव घालून करण्यात आली. डॉ. चितारी यांना जिल्हा रुग्णालयात डय़ुटी देण्यात आली, ती रद्द करावी. वरिष्ठांशी बोलून त्यावर तोडगा काढू, असे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱयांनी त्यांना सांगितले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आनंद परुळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, चित्रा देसाई, पपू शेख, शिवम सावंत, राकेश चितारी, मोहसीन मुल्ला आदी उपस्थित होते.