प्रतिनिधी / बेळगाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत साध्यापद्धतीने साजरी करण्यात आली. सकाळी 9.30 वाजता अशोक स्तंभापासून ज्योत आणण्यास सुरुवात झाली. सर्किट हाऊस, चव्हाट गल्ली, कोर्ट आवार त्यानंतर कित्तूर चन्नम्मा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे ज्योतीचे आगमन झाले. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी स्वागत केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे बुद्धविहार येथे कार्यक्रम पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, महापालिका आयुक्त जगदीश के. एच. याचबरोबर समाज कल्याण खात्याच्या अधिकारी यांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. राजकीय विविध नेत्यांनीही त्यांना अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ यांच्यावतीने मल्लेश चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी बसवराज रायागोळ, सिद्धराय मेत्री, सिद्धाप्पा कांबळे, गौतम पाटील, शंकर कांबळे, सागर कुडची, सुधीर चौगुले, विनोद सोलापुरे, आनंद कांबळे, आनंद कोलकार, रामानंद मेत्री, महांतेश कोलकार यांच्यासह विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.